esakal | यंदा नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळाता येणार नाही, यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळाता येणार नाही, यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.  

यंदा नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळाता येणार नाही, यंदाचा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : देशभरात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव नाही. महाराष्ट्रातही कोरोना अद्याप नियंत्रणात आलेला नाही. कोरोनावर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. अशात अनलॉकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कोणतेही सणवार साजरे केलेले नाहीत. आता अनलॉक सुरु असताना आता नवरात्रीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सणांप्रमाणे नवरात्रीचा सणही साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.  

सावधान ! काँगो' ताप महाराष्ट्रात हातपाय पसरतोय; ही आहेत लक्षणं आणि अशी घ्या काळजी

असा साजरा करावा लागणार नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा : 

  • सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून हाही सण आपल्याला साजरा करायचा आहे. 
  • गणपतीप्रमाणे नवरात्रातही देवीच्या आगमन आणि विसर्जनाला मिरवणूक काढता येणार नाही 
  • नागरिकांनी सार्वजनिक देवी मंडळात गर्दी करू नये आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा 
  • सार्वजनिक मंडळांनी देवीची ४ फुटांच्या आतील उंची असलेली मूर्ती बसवावी
  • घरगुती मूर्ती २ फुटांपेक्षा मोठी नसावी 
  • नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडियाची मोठी धमाल असते. मात्र यंदा गरबा आणि दंदीया कार्यक्रम घेता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तसे आदेश दिले आहेत. 
  • देवीचं दर्शन सर्वांना घेता यावं यासाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा फेसबुक युट्युब किंवा संकेतस्थळांच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी

महत्त्वाची बातमी : राज्याच्या संकाटात आणखी भर! कोरोनानंतर ‘कांगो फिवर? उपचार, निदानाअभावी 30 टक्क्यांपर्यत मृत्यूची शक्यता

रावणदहन करा पण गर्दी ना करता : 

सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दसऱ्याला रावणदहन कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा होणार नाही याची काळजी घेऊन रावण दहन कार्यक्रम घेण्यास परवानगी आहे.  

Maharashtra state government issued guidelines for navaratri and dussehra