100 युनिटपर्यंतची वीज होणार फ्री.. फ्री.. फ्री..; ऊर्जामंत्र्यांचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मुंबई - महाराष्ट्र सरकार येत्या काळात राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे. हा दिलासा आहे मोफत विजेच्या स्वरूपातील. कारण महाराष्ट्र सरकार राज्यातील 100 युनिट पर्यंतची वीज 'फ्री' करणार असल्याचे समजतंय. राज्यात 200 युनिट पर्यंत फ्री वीज देणं शक्य आहे, अशात 100 युनिटपर्यंतची फ्री वीज ग्राहकांना कशी मिळेल यावर सरकार विचार करतंय. याबद्दलची माहिती स्वतः ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. 

मोठी बातमी - दोन तास चार्ज करा, 120 किलोमीटर पळवा!

वीजग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चर्चा केलीये.  मोफत वीज देण्यासाठी सरकार विचाराधीन आहे. सर्वात आधी वीज निर्मितीसाठी येणारा खर्च कमी करणे आणि वीजचोरीला आळा घालणं यावर सरकार काम करेल. यानंतर मोफत वीज देण्यावर सरकारकडून  काम केलं जाईल, असं स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणालेत. 

मोठी बातमी - क्या बात हैं ! 'या' भारतीय शास्त्रज्ञाने शोधलीये कोरोनावरील लस!

महाराष्ट्रात ५,९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिला अशात यावरील सुनावणीनंतर MERC निर्णय देणार आहे. यामध्ये सामान्य ग्राहकांचं हित पाहूनच निर्णय घेणार असल्याचं नितीन राऊत म्हणालेत. महावितरण याचसोबत तीनही वीज कंपन्यांना आपापल्या खर्चात कपात करणार असून त्यासाठीची एक योजनाही मागविली आहे, असंही ऊर्जामंत्री म्हणालेत. 

maharashtra state government is planning to give free electricity upto 100 units

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government is planning to give free electricity upto 100 units