कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकारही SIT नेमणार, गृहमंत्र्यांचे स्पष्ट संकेत...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून महाविकास आघाडीत बिघाडी झालीये का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करत कोरेगाव भीमा एल्गार परिषदेचा तपास NIA कडे दिला असं नाराजीच्या स्वरात अनिल देखमुख यांनी माध्यमांना सांगितलं होतं. यांनतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कोरेगाव भीमा तपास प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.

आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधत अनिल देशमुख यांनी कोरेगाव भीमा एल्गार परिषद तपासासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. अनिल देखमुखांचं 'हे' वक्तव्य म्हणजे राज्यसरकारने उचललेलं हे मोठं पाऊल म्हणावं लागेल.  

मोठी बातमी - आरशातून तो एकटक तिच्याकडे पाहत होता, एक चुकीचा टर्न घेताच तिनं मारली उडी...

कोरेगाव भीमा प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकार स्वतंत्र तपासणी करणार असल्याचे संकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी दिले आहेत. कोरेगाव भीमा एल्गार परिषदेच्या तपासणी प्रकरणी अनिल देखमुख यांनी ऍटर्नी जनरल यांच्याशी बातचीत केल्याचं समजतंय 

मोठी बातमी -  नव्या आदेशांमुळे वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार ?

काय म्हणालेत गृहमंत्री अनिल देशमुख ?

"राज्य शासनाकडून कोरेगाव भीमा एल्गार परिषदेचा तपास NIA कडे गेलेला असताना, राज्य सरकारला SIT नेमता येते का? याबाबत ऍटर्नी जनरल यांच्यासोबत राज्य सरकारने पत्रव्यवहार सुरु केलाय. ऍटर्नी जनरल यांच्या कायदेशीर अभिप्रायानंतर आणि होकारार्थी अभिप्रायानंतर कोरेगाव भीमा प्रकरणी महाराष्ट्र  राज्य सरकार SIT ची स्थापना करेल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत. 

maharashtra state government is planning to from seprate SIT in koregaon bhima case

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state government is planning to from seprate SIT in koregaon bhima case