भाजप सरकारने भारतरत्नाची प्रतिष्ठा पणाला लावणे अयोग्यच - राज ठाकरे

भाजप सरकारने भारतरत्नाची प्रतिष्ठा पणाला लावणे अयोग्यच - राज ठाकरे

ठाणे  -   कृषी कायदा हा सरकारच्या धोरणाचा विषय आणि देशाचा विषय नाही. तसेच चीन आणि पाकच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा बंदोबस्त दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी आहे अशी खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केली. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलन औरंगाबादाचा नामांतर आणि महावितरणाविरोधात पुकारलेल्या आंदोलनावरून भाजप सरकारचा समाचार घेतला. याप्रसंगी मनसे नेते बाळ नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, आमदार राजू पाटील आदी उपस्थित होते.

शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयातून ठाण्यात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर टिका केली. दिल्लीत सूरु असलेल्या आंदोलनाबाबत छेडले असताना, त्यांनी शेतकरी आंदोलन चिघळण्याची गरज नव्हती. शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत. हे जाणून घेणे गरजेचे होते. तसेच सरकारने आणलेला कायदा चुकी नाही. पण त्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, तर प्रत्येक राज्यात कृषी खाते आहे. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असल्याने त्याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारने बसून हा प्रश्न सोडवावा. यामध्ये एक - दोघांचा फायदा होऊ नये असे वाटते. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी असलेला बंदोबस्त हा चीन आणि पाकच्या सीमांवर असलेल्या बंदोबस्तापेक्षा जास्त आहे. तसेच यामध्ये पंतप्रधान यांनी लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले.भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या मोठ्या लोकांना ट्विट करण्यास भाजप सरकारने सांगून त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सध्या टीकेचे धनी होत असलेल्या या मंडळींबाबत हे अयोग्यच असून हा विषय अक्षय कुमार यांच्या सारख्या लोकांवर आटोपायचा होता.

      संभाजीनगरच्या नामांतरावरून प्रश्न विचारला असता, केंद्र आणि राज्यात सरकार असताना हा नामांतराचा मुद्दा का आणला नाही. भाजप सरकारने शहरांची तसेच दिल्लीतील रस्त्यांची नावे बदली याची भाजप आणि सेनेने पहिली उत्तरे द्यावी. तुम्ही लोकांना वेडे समजू नका. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणला आहे. संभाजीनगरची जनता हुशार आहे. तीच मंडळी नामांतराचा योग्य निर्णय घेतली असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत विचारले असता, तो पक्षांतर्गत विषय त्याबाबत चर्चा करून शकत नाही असे म्हणून त्यांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर बोलणे टाळले.

* अयोध्या जाईल तेंव्हा सांगेल
     अयोध्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारताच त्यांनी जाण्याची इच्छा आहे. नेमके कधी जाईल हे माहीत नाही. पण जेंव्हा जाईल तेंव्हा नक्कीच कळवले असे खोचटपणे उदगार काढले

* जमील शेखचा चांगल्याप्रकारे सुरू
राबोडीतील मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत राज ठाकरे यांनी ठाणे शहर पोलिसांकडून माहिती जाऊन घेतली. त्यानंतर, त्याच्यावर बोलताना त्याचा तपास चांगला सुरू असून लवकरच निर्णय होईल असे म्हटले.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

maharashtra thane political latest update marathi Raj Thackeray criticism on farmers protest BJP politics

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com