महाराष्ट्रातील रेल्वे फाटकं इतिहासजमा होणार! देशातील पहिलं रेल्वे गेट-मुक्त राज्य बनणार; फडणवीसांनी दिले स्पष्ट निर्देश

Mumbai railway project: मुख्यमंत्र्यांनी महारेलच्या एका महत्त्वाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. महाराष्ट्राला रेल गेट मुक्त करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या आरओबी आणि अंडरपासच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला.
Railway level crossings

Railway level crossings

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपास बांधून महाराष्ट्राला 'गेट-टू-गेट' राज्य बनवण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांनी महाराष्ट्राला 'गेट-टू-गेट' राज्य बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचा आणि प्रमुख उपक्रमांच्या सद्यस्थितीचा आढावा दिला. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे एकूण १३१ प्रकल्प आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com