

Devendra Fadnavis addresses questions on the Uniform Civil Code and constitutional provisions in Maharashtra.
esakal
मुंबई, : महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा (यूसीसी) मसुदा तयार करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी समर्थन केले. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक राज्याला समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश देतात. त्यामुळे हा निर्णय घटनात्मक जबाबदारीचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.