महाराष्ट्रात वाहन चालवताना मोबाईल वापरणे गुन्हाच

ब्रह्मा चट्टे
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - वाहन चालवताना मोबाईल वापरने बेकायदा नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा निकाल देताना स्पष्ट केले आहे. या निकालानंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्रातील मोटार वाहन कायद्यानुसार राज्यात वाहन चालवताना मोबाईल वापरणे गुन्हाच असल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगतले.

केरळच्या मोटार वाहन अधिनियमात मोबाईल फोनच्या वापराबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या राज्यात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे गुन्हा ठरत नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, हा निर्णय महाराष्ट्रात लागू होऊ शकत नाही. कारण प्रत्येक राज्याचा मोटार वाहन कायदा वेगळा आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 1989 नियम 250- अ (1) नुसार वाहन चालवताना मोबाईल वापरणे गुन्हाच आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 250 - अ (1) आणि मोटार वाहन कायद्याच्या 2000 मधील तरतुदीनुसार मोबाईल वापरण्यास मनाई आहे. त्यानुसार दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोबाईल वापरणे गुन्हा आहे. त्याचबरोबर याच कलमानुसार नियम (2) नुसार चालक एकटाच प्रवास करत असेल तर प्रवासादरम्यान मोबाईल बंद ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्याचा भंग केल्यास हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांसाठी चालक परवाना (ड्राव्हिंग लायसन) रद्द करण्याची तरतूद आहे.

केरळ उच्च न्यायालयाने वाहनचालकांच्या मोबाईल वापरासंदर्भात दिलेला निकाल वाचलेला नाही. त्यामुळे त्यासंदर्भात प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ते निकालपत्र मिळालेले नाही. मात्र, महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 1989 मध्ये याबाबत तरतुदी आहेत.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त.

Web Title: maharashtra vehicle drive RTO mobile use crime