

Mumbai
esakal
मुंबई: विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत ताणलेली उत्सुकता अखेर संपली असून महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करीत विधान परिषदेच्या नऊ नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी अशा सर्व दहा जागांसाठी दहाच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीने आपली मांडणी कायम ठेवत मित्रपक्षांना सोबत घेतले, तर महाविकास आघाडीत (मविआ) निर्माण झालेला तणाव शेवटच्या क्षणी चर्चेतून निवळल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली.