
मुंबई : वांद्रे येथील संरक्षण खात्याच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास रखडल्याच्या मुद्द्यावरून मंत्री शंभूराज देसाई दिशाभूल करणारे उत्तर देत असल्याचा आक्षेप घेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांनी मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मंत्र्याच्या उत्तरावर हरकत घेण्याऐवजी पुन्हा प्रश्न विचारा, असे सांगत मंत्री देसाई यांनी तुमच्या सरकारच्या काळात याचा पाठपुरावा का केला नाही असा प्रतिप्रश्न करताच शिवसेनेचे सदस्य कमालीचे आक्रमक झाले. याचा मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.