Vidhan Sabha 2019 : भिवंडी पश्‍चिम : काँग्रेस, ‘एमआयएम’चे भाजपसमोर आव्हान!

Mahesh-and-Khalid
Mahesh-and-Khalid

विधानसभा 2019 : भिवंडी पश्‍चिम मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश चौघुले रिंगणात आहेत. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि ‘एमआयएम’ पुरस्कृत खालिद गुड्डू शेख आणि काँग्रेसचे शोएब खान यांचे चौघुलेंसमोर आव्हान आहे. चौघुले यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. शहरासह तालुक्‍यात त्यांनी शैक्षणिक संस्था, उड्डाण पूल, रस्ते या कामांकडे अधिक लक्ष दिले आहे. ग्रामपंचायती आणि महापालिकेवरील वर्चस्वाचा फायदाही चौघुलेंना होऊ शकतो; मात्र हे करताना ‘एमआयएम’ आणि काँग्रेस यांच्या आव्हानाला ते कशा पद्धतीने सामोरे जातात, हे पाहाणे औत्सुक्‍याचे ठरेल.

महेश चौघुले
बलस्थाने

    रस्तेकाम, शेतकऱ्यांना मदत.
    नळपाणी योजना, स्मशानभूमी दुरुस्ती आणि नूतनीकरण, 
    भिवंडी शहरात सिमेंटचे रस्ते, पेव्हर ब्लॉक, यंत्रमाग उद्योगास सहकार्य.
    मुस्लिम समाजातील तरुणांशीही चांगला संपर्क.

कमजोरी
    कामांची माहिती मतदारांपर्यंत पोचलेली नाही.
    ‘तीन तलाक’प्रकरणी मुस्लिम समाजात भाजपबाबत नाराजी.
    पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची शक्‍यता.
    रस्त्यांची दयनीय स्थिती.

खालिद शेख
बलस्थाने

    मुस्लिम समाजासह हिंदू समाजाशीही जनसंपर्क.
    खराब रस्ते, तसेच अन्य प्रश्‍नांवर सातत्याने आंदोलन आणि मोर्चा.
    टोरंट वीज कंपनी आणि जादा बिलांबाबत आंदोलनाने चर्चेत.
    आरोग्य शिबिरे, टंचाईग्रस्त भागांत मागेल त्याला टॅंकर.

कमजोरी
    आधी राष्ट्रवादीचे पदाधिकारी; मात्र निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘एमआयएम’मध्ये प्रवेश.
    पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळचे कार्यकर्ते दुखावले.
    आर्थिक बाजू कमकुवत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com