विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकलेत, अजित पवारांनी मागितली माफी....

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले भडकलेत, अजित पवारांनी मागितली माफी....

मुंबई - विधिमंडळाच्या कामकाजावरून विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे यांनी नाराजी व्यक्त केलीये. यावेळी नाना पटोले यांचं चिडलेलं रूप पाहायला मिळालं. सभागृहात अवचित्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर वेळेत उत्तर मिळत नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. दरम्यान मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन माफी मागावी, असे आदेश नाना पटोले यांनी दिलेत. यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणे आजतागायत मुख्य सचिव यांना शिक्षा दिलेली नाही. त्यामुळे मुख्य सचिवांना माफी मिळावी यासाठी अजित पवार यांनी विनंती केली, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना समर्थन दिलं. 

काय म्हणालेत नाना पटोले: 

अवचित्याच्या मुद्द्यांना उत्तर मिळत नसल्याने नाना पटोले चांगलेच भडकलेले पाहायला मिळालेत. सभागृहात बोलताना नाना पटोले म्हणालेत, "सभागृहात  अनेक अवचित्याचे मुद्दे सदस्यांनी उपस्थित केले आहेत. १ महिन्यात या अवचित्याच्या मुद्द्याचं उत्तर आपल्या सर्वांना मिळेल असं सांगण्यात आलं होतं. याचवेळचे नव्हे तर मागच्या काळातील अनेक अवचित्याचे मुद्दे त्या त्या विभागांकडे पडून आहेत. या बाबतीत मी स्वतः मुख्य सचिवांशी आणि सचिवालयाशी पत्रव्यवहार करतोय. मात्र त्याची साधी दखल देखील घेतली जात नाही, याचं गांभीर्य मी सभागृहासमोर आणू इच्छितो. "

"या सभागृहातून अध्यक्षांनी एकदा शिक्षेचे आदेश दिलेत, तर त्याला कुठल्याही प्रकारचा जामीन मिळू शकत नाही. प्रशासनात जी व्यवस्था निर्माण झालीये याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. या सभागृहात जे काही कामकाज सुरु आहे त्याचं गांभीर्य सचिवालय घेत नाही. आज संध्याकाळी ससाडे पाच वाचता मुख्य सचिवांनी विधिमंडळाच्या गेटवर येऊन माफी मागावी आणि यावर कधीपर्यंत ऊत्तर मिळेल याचा खुलासा करावा", असे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेत. 

काय म्हणालेत अजित पवार: 

"शासन म्हणून आपल्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो. या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर आपण आहेत त्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. आपली खंत उचित आहे. सभागृहातील २८८ आमदार तीन ते साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. या नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी अवचित्याच्या प्रश्नांच्या माध्यमातून प्रश्न मांडल्यानंतर सचिवांच्या माध्यमातून ठरविक काळात उत्तर मिळायला हवं याबद्दल आम्ही सहमत आहोत. मी झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. याबद्दल आज मी मुख्य सचिव आणि सर्वांची बैठक बोलवून याबद्दल सक्त सूचना देतो. पुन्हा अशी वेळ येणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ", अशी ग्वाही अजित पावर यांनी सभागृहात दिली. "आजपर्यंत अध्यक्षांनी सचिवाने अशी शिक्षा केलेली नाही. त्यामुळे सचिवाने माफ करावं", अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली.  

असं दिलं फडणवीसांनी समर्थन   

सभासदांच्या अधिकाराबाबत जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. अशी कारवाई करेपर्यंत प्रशासन जागं होतं नाही. दरम्यान कुणावर कारवाई करत असताना त्यांना एक संधी दिली पाहिजे. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याठिकाणी शासनातर्फे दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांना शिक्षा देण्याऐवजी तुम्ही, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना बोलावून कडक समज द्यावी. पुन्हा असं झालं तर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांना सांगण्यात यावं", असं फडणवीस म्हणालेत.  

maharashtra vidhansabha speaker angry on chief secretory ajit pawar apologies

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com