मोठी बातमी : मातोश्री परिसरातून पिस्तुलधारी इसमाला अटक !

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 मार्च 2020

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाच्या निशाण्यावर असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण बातमी देखील तशीच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेरून  एका इसमाला अटक करण्यात आली आहे.

भीषण आणि धक्कादायक बाब म्हणजे मातोश्री परिसरातून ताब्यात घेणाऱ्या इसमाकडे पिस्तुल आणि 4 काडतुसे देखील हस्तगत करण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या परिसरातुन या बंदूकधारी इसमाला पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने कारवाई करत या इसमाला ताब्यात घेतलंय. या बंदूकधारी इसमाची आता पोलिस कसून चौकशी करतायत. इर्शाद खान असं या इसमाचं नाव आहे. इर्शाद या भागात शस्त्र विकण्यासाठी आला होता अशी प्राथमिक माहिती मिळतेय..

महत्त्वाच्या बातम्या 

man with pistol arrested from cm residential area matoshree mumbai police doing investigation  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man with pistol arrested from cm residential area matoshree mumbai police doing investigation

फोटो गॅलरी