

10 Percent Water Cut In Maharashtra From October 16 Government Orders Strict Water Conservation Due To Limited Dam Storage
sakal
मुंबई : ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात कमी पाऊस पडल्याने आणि त्यामुळे जलसाठा मर्यादित राहिल्याने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी येत्या १६ तारखेपासून सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान दहा टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. ऑगस्ट २०२७ अखेरपर्यंत पाण्याचे धरणनिहाय व वापरनिहाय नियोजनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई भासू नये, यासाठी पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याने या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यास बजाविण्यात आले आहे.