सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता . २१ : ऐन दिवाळीत मंगळवारी (ता. २१) सायंकाळपासून मुंबईत अचानक पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारास काळे ढग दाटून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि काही क्षणांतच मुसळधार सरी कोसळू लागल्या. फोर्ट, भायखळा, लालबाग, दादर, प्रभादेवी, परळ, सायन, कुर्ला, वांद्रे, पवई, अंधेरी आणि मालाड या भागांत चांगला पाऊस झाला. अचानक पाऊस सुरू झाल्याने कामावरून घरी जाणारे तसेच दिवाळीच्या निमित्ताने बाजारात आलेले नागरिक अडचणीत सापडले.