Rain Update
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने धुमाकूळ घातला असून, आठही तालुक्यांत नवरात्रोत्सवावर विरजण आले आहे. पावसाने सप्टेंबरची सरासरी गाठली असून, आतापर्यंत या महिन्यामध्ये ८१ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागाने केली आहे. पालघर जिल्ह्यात वीज पडून सहा जण जखमी झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.