
मुंबई : मुंबईकरांनी आज दिवसभर दमट हवामानाचा चांगलाच तडाखा सहन केला. सकाळपासूनच वातावरणात असह्य उकाडा जाणवत होता. दुपारी आर्द्रता ७६ टक्क्यांपर्यंत पोहोचली, संध्याकाळी ती वाढून ७९ टक्क्यांवर गेली, तर रात्रीच्या सुमारास ही आर्द्रता तब्बल ९० टक्क्यांच्या घरात पोहोचल्याची नोंद झाली.