
Palghar Amritsar Express Coach Derailed
ESakal
मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे लोकल सेवेवरही फटका बसला आहे. तर दुसरीकडे आता पालघरमध्ये एक्सप्रेसचे डब्बे निघाल्याने वाहतूक कोलमडल्याचे दिसून आले आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.