esakal | राज्यात दिवसभरात कोरोनाचा उच्चांक, आकडा वाचून थरकाप उडेल
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यात 63 करोनारुग्णांचा आज मृत्यू झाला. मुंबई मध्ये 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापूरात 5, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद  शहरात 3, साता-यात 2, मालेगावमध्ये 1, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल आणि नागपूर शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला.

राज्यात दिवसभरात कोरोनाचा उच्चांक, आकडा वाचून थरकाप उडेल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यात तब्बल 2940 नव्या कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी (ता. 22) झाली. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता 44,582 वर पोहोचला आहे. आज 857 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 12,583  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 30,474  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना क्वांरटाईन केले आहे. 

महत्वाची बातमी : कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

राज्यात 63 करोनारुग्णांचा आज मृत्यू झाला. मुंबई मध्ये 27, पुण्यात 9, जळगावमध्ये 8, सोलापूरात 5, वसई विरारमध्ये 3, औरंगाबाद  शहरात 3, साता-यात 2, मालेगावमध्ये 1, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पनवेल आणि नागपूर शहरात प्रत्येकी एक मृत्यू झाला. मृतांपैकी 37 पुरुष: तर 26 महिला आहेत.  60 वर्षे किंवा त्यावरील 28  रुग्ण आहेत; तर 31 मृत्यू झालेले रुग्ण 40 ते 59  वयोगटातील आहेत. 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 63 रुग्णांपैकी 46 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, असे अतिजोखमीचे आजार होते.

महत्वाची बातमी सावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1517 झाली आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1949 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16,154 सर्वेक्षण पथकांनी 66.32 लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. राज्यात 4,69,275 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 28,430 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

maharashtra will tremble throughout the day reading Corona positive highest