Maharashtra Election Update
esakal
मुंबई : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची (Maharashtra Zilla Parishad Elections 2026) रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला वेग आला असून पुढील आठवड्यात या निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार सुरू आहे.