Inside Story : आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी 'हा' आहे सरकारचा 'मास्टरप्लान'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी म्हणजे 30 डिसेंबररोजी 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर महाविकास आघाडीतील मंत्रिपदासाठीची चुरस आणि मंत्रिपद न मिळाल्याने पडद्यामागील धुसफूस पाहायला मिळाली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत याचा महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यात मोठा वाटा आहे. अशातच संजय राऊत याचे भाऊ सुनील राऊत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असं बोललं जात होतं. मात्र तसं न झाल्याने शिवसेनेतील धुसफूस समोर आली. फक्त सुनील राऊतच नाही तर याआधी शिवसेनेचे मंत्री राहिलेले तानाजी सावंत यांच्या ऐवजी आमदार आदित्य ठाकरे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. 

मोठी बातमी :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मातोश्रीवर...!

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील देखील अंतर्गत धुसफूस समोर आली. प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार थेट आपला आमदारकीचा राजीनामा देणार होते. मात्र अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी समजूत काढण्यानंतर सोळंके यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला. कॉंग्रेसच्या संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पुण्यातील कॉंग्रेस कार्यालयाचीच तोडफोड केली. 

अशात महाविकास आघाडीतील मंत्रिपद मिळवण्याची चढाओढ समोर आलीये. मात्र नाराज आमदारांची नाराजी टाळण्यासाठी सरकारचा आणखी एक उपाय आखलाय. मंत्रालयात अधिक स्वतंत्र विभाग तयार करून मंत्री नेमण्याची तयारी महाविकास आघाडीकडून केली जातेय.

मोठी बातमी : दालनांचा ताबा घेतला, मात्र खात्यांसाठी मंत्र्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'

PMO म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री कार्यालयीन मंत्री म्हणून मंत्रिपद देण्याची उच्चस्तरावर चर्चा सुरु आहे. राज्यातील करोडो रुपयांचं उत्पन्न असलेल्या सर्व तिर्थक्षेत्रांना एक मंत्री नेमण्याची उच्चस्तरावर चर्चा आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील व्यापारा संदर्भात वाणिज्य विभाग तयार करण्याची शक्यता वर्तवली जातेय. या विभागात जीएसटी सारखा मोठा विषय घेऊन तो मंत्री केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांमधील दुवा म्हणून काम करणार आहे.  राज्यातले वाढते मेट्रो प्रकल्प लक्षात घेता मेट्रोसाठी सरकार वेगळं खातं निर्माण करण्याच्या विचारात आहे. 

महाराष्ट्रातील मंत्र्यांचं खातेवाटप अजून झालेलं नाही. मात्र खातेवाटपाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली असून मुख्यमंत्री यावर निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.  

WebTitle : mahavikas aaghadi is  working on a master plan to establish CMO office in maharashtra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahavikas aaghadi is working on a master plan to establish CMO office in maharashtra