राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मातोश्रीवर...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्याकरता आज सायंकाळी थेट मातोश्रीवर दाखल झाले. ठाकरे कुटुंबियांच्या सोबत स्नेहभोजनाचा आस्वाद देखील राज्यपालांनी यावेळी घेतला.

गेले दोन महिने राज्यात जे सत्ताकारणाचं राजकारण सुरू होतं त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेना यांच्यातील संबध फारसे चांगले नसल्याचं दिसून आलं होतं. नुकत्याच झालेल्या मित्र मंडळ विस्ताराच्या वेळीही राज्यपालांनी अनेक मंत्री शपथ घेत असताना नियमांवर बोट ठेवत आक्षेप घेतला होता.

या बातम्या वाचल्यात का ?

  1. संजय राऊत पुन्हा कडाडले, म्हणतायत.. 
  2. खातेवाटप न झाल्याने वाढतेय मंत्रालयातील फाईल्सची संख्या..
  3. दालनांचा ताबा घेतला, मात्र खात्यांसाठी मंत्र्यांचे 'वेट ऍन्ड वॉच'
  4. रणवीर सिंगवर का आली भाड्याच्या घरात राहायची वेळ
  5. नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; तक्रार दाखल

काँग्रेसचे मंत्री के सी पाडवी यांना शपथ परत घ्यायला लावली होती. त्यामुळे पुढील काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पहायला मिळणार असल्याचीही राजकिय वर्तुळात चर्चा होती.

पण आज अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्नेह भोजनासाठी थेट मातोश्रीवरच दाखल झालेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात स्थिर सरकार चालवण्यासाठी राज्यपाल आणि सरकार यांच्यात चांगले संबध निर्माण करण्यासाठीच आजच्या स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

WebTitle : maharashtra governor bhagatsingh koshyari goes to matoshree to meet CM Uddhav Thackeray

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra governor bhagatsingh koshyari goes to matoshree to meet CM Uddhav Thackeray