
मुंबई : इंधनाच्या वाढत्या किंमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी विजेवरील वाहनांच्या (इलेक्ट्रिक) वापराला सुरूवात केली. परंतू आता त्यांच्याही खिशाला चांगलाच फटका बसणार आहे. १ जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रतियुनिट मागे ५० पैशांहून अधिकची वाढ होणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे निश्चित झाले आहे.