महावितरण भरतीच्या जाहिरातीत आरक्षणाची चूक

Mahavitaran
Mahavitaran

मुंबई - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणने पाच हजार वीज सहायकांच्या पदांसाठी मंगळवारी (ता. 9) जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये ओबीसी वर्गासाठी चुकीच्या जागा देण्यात आल्याने याविरोधात ओबीसी संघटनांनी आरक्षणात बदल केल्याचा आरोप केला होता. यानंतर महावितरणने जाहिरातीमध्ये सुधारणा केली.

महावितरणने 9 जुलै रोजी रात्री 10.40 वाजता संकेतस्थळावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसींसाठी 81 जागा दर्शविण्यात आल्या होत्या. आरक्षणाप्रमाणे ओबीसींसाठी 1 हजार 507 पदे असायला हवी होती. महावितरणच्या तांत्रिक चुकीला ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतला. याबाबत तक्रार होताच महावितरणने जाहिरातीमध्ये सुधारणा केली. या जाहिरातीमध्ये ओबीसींच्या 1507 पदांसाठी अर्ज मागवण्यात आल्याची सुधारणा करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com