

Municipal Corporation Election
ESakal
उल्हासनगर : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सुभाष टेकडी परिसरात महायुतीचे चार उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. असे असतानाही एकाच निवडणूक चिन्हावर प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी (पीआरपी)च्या ‘नगारा’ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हा अनोखा निर्णय शहराच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.