
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : चहासोबत प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात. चहा-बिस्कीटचा घेतलेला आनंद, टपरीवर मित्रांसोबत प्यायलेला गरमागरम चहा, कामाचा ताण घालवण्यासाठी प्यायलेला मस्त कडक चहा... अशातच आगामी महापलिका निवडणुकीची चर्चा चहादिनीदेखील दिसून आली. भाजपने टपरीवर चहाचे घोट घेत ‘आजच्या दिवस चहा प्या आणि लवकरच महापालिकेत भाजपचा महापौर पाहा’असा नारा दिला.