

BJP & Shivsena Fight
ESakal
ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रातील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. शहरात रविवारी पार पडलेल्या सात विकास प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यांत भाजपच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा आरोप ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत प्रकल्पांचे उद्घाटन पुन्हा करण्याची मागणी केली आहे.