

KDMC
Esakal
डोंबिवली : उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील महायुतीचा वाद उफाळून आल्यानंतर त्याचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीतही उमटू लागले आहेत. उल्हासनगर महापालिकेतील युतीतून बाहेर पडण्याची भाजपची भूमिका आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम न करण्याच्या घोषणेनंतर दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच केडीएमसीतील भाजप नगरसेवक मंदार टावरे यांनी उल्हासनगरचे महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावर केलेली टीका चर्चेत आली आहे.