तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Professor Recruitment: महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षण विभागात ५,००० हून अधिक प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
Professor Recruitment

Professor Recruitment

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत घोषणा केली की, महाराष्ट्रात लवकरच ५,००० हून अधिक प्राध्यापकांसाठी एक मोठी भरती मोहीम राबविली जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण भरती प्रक्रिया जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com