

BJP state president Ravindra Chavan
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, सर्वच महापालिकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने संपूर्ण राज्यात प्रभावी प्रचार केला असून, त्याचा सकारात्मक परिणाम आजच्या मतदानात दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.