

Mahesh Tutorials 33 branches closure
ESakal
मुंबई : महेश ट्युटोरियल ही मोठी कंपनी होती. कंपनी आणि खासगी क्लास चालविणाऱ्या संस्थांमध्ये मोठे अंतर आहे. राज्यात यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांनी क्लासच्या नावाखाली अशी फसवणूक केली आहे. राज्यात विविध शिक्षणतज्ज्ञ, शिक्षकांच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे तब्बल ९९ हजार खासगी क्लास चालवले जातात. यामुळे एखाद्या कंपनीकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करून ती बंद केली जाणार असेल तर त्यात राज्यातील खासगी क्लास संघटनांची बदनामी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने केले आहे.