सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी ST ने आणखी वाढवल्यात फेऱ्या...

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी ST ने आणखी वाढवल्यात फेऱ्या...

मुंबई : उपनगरांतील व्यवहार पूर्ववत करण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत एसटी बसची अतिरीक्त सेवा देण्यात येत आहे. सोमवारपासून 250 बसगाड्या वाढवल्याने सध्या 700 पेक्षा जास्त फेऱ्या होत आहेत. अत्यावश्यक सेवेतील 15 हजार कर्मचारी एसटी बसमधून प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले. 

एसटी महामंडळाने सोमवारी सोडलेल्या अतिरीक्त बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे मंगळवारी बस फेऱ्यांमध्ये वाढ करून प्रवाशांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, याची याची काळजी घेण्यात आली. 'मिशन बिगीन अगेन' टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, मंत्रालय व अन्य सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खासगी कार्यालयांत 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. 

पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत मंत्रालय, महापालिका भवन या मार्गांवर एसटी बसच्या 717 फेऱ्या झाल्या आणि 13 हजार 78 नागरिकांनी प्रवास केला. याच मार्गांवर मंगळवारी दुपारी 4 वाजेपर्यंत एसटी बसच्या 803 फेऱ्या झाल्या आणि 13 हजार 500 नागरिकांनी प्रवास केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

to maintain social distancing ST has increased frequency of buses

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com