चाहत्यांपेक्षा खेळाडू तयार करा - सचिन

चाहत्यांपेक्षा खेळाडू तयार करा - सचिन

तुर्भे - क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची कामगिरी समाधानकारक नसते. कारण आपल्या देशात खेळावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक असून खेळण्यापेक्षा मागे बसून टाळ्या वाजवण्यात त्यांना अधिक आनंद असतो. पण फक्त खेळ पाहणाराच नाही, तर खेळणारा देश, अशी आपली ओळख निर्माण करण्यासाठी चांगले खेळाडू तयार करण्याची जबाबदारी सर्वांची असून त्या दृष्टिकोनातून देशातील विद्यापीठांनी आणि शिक्षण संस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरने शुक्रवारी (ता.३०) डी. वाय. पाटील विद्यापीठात सुरू असलेल्या कुलगुरूंच्या परिषदेमध्ये केले. 

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्यावतीने उच्च शिक्षणात खेळांचा समावेश प्रभावीपणे करून घेण्यासाठी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात कुलगुरू परिषद भरविण्यात आली आहे. परिषदेचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष प्रा. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते झाले. या परिषदेला देशाच्या पश्‍चिम भागातील सुमारे ८० विद्यापीठांचे कुलगुरू आणि प्रतिनिधी उपस्थित आहेत. 

परिषदेला असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष संदीप संचेती, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती विजय पाटील, कुलगुरू डॉ. शिरीष पाटील, शिवाजी कदम, माणिकराव साळुंके, पैरखान कमर आदी उपस्थित होते.

जन्मजात गुण ओळखणे गरजेचे
अनेक मुलांमध्ये जन्मजात कौशल्याची देणगी असते. त्या मुलांना जर त्यांच्या आवडीचे क्षेत्र देऊन चांगले मार्गदर्शन केले, तर ते चांगले खेळाडू तयार होऊ शकतात. सरावाने तयार केलेल्या कौशल्यापेक्षा जन्मजात कौशल्य हे कधीही चांगले आहे. त्यामुळे जन्मजात खेळाचे गुण असलेल्या विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असाही सल्ला सचिनने उपस्थितांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com