अपघातात पत्नीचा मृत्यू, शेवटचं पाहण्यासाठी पती व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत; आईच्या मायेला पोरकं झालेल्या चिमुकल्यांचा टाहो

Malad Accident मालाडमध्ये रविवारी रात्री कारने धडक दिल्यानं दुचाकीवरून निघालेल्या प्रियांका सत्रा यांचा मृत्यू झाला. तर पती मयांक गंभीर जखमी झाले. प्रियांका यांच्यावर अंत्यसंस्कारावेळी पती व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत आले होते.
Malad Accident

Malad Accident

Esakal

Updated on

मुंबईत रविवारी एका कारने अनेक गाड्यांना धडक दिली होती. ७० वर्षीय कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला होता. या अपघातात वकील असलेल्या प्रियांका सत्रा यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती मयांक सत्रा जखमी झाले आहेत. मयांक यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी पती मयांक हे व्हीलचेअरवरून स्मशानभूमीत आले होते. अपघाताने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं दृश्य पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com