
मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कांदिवली आणि मालाडमध्ये रस्ते वाहतूक बदल करण्यात आला आहे. कांदिवलीमध्ये सम-विषम पार्कींग तर मालाड परिसरात नो पार्किंग करण्यात आली आहे. यामुळे आता मालाड, कांदिवलीची वाहतूक कोंडी सुटणार असून प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि जलद होणार आहे.