Mumbai News : मालाड पूर्वेकडे नाल्यात सापडली चिमुरडी; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मालाड पूर्व परिसरातील नवजाला पाडा येथील नाल्यात नवजात लहान मुलगी जखमी अवस्थेत सापडल्याची घटना नोंदवण्यात आली आहे.
Crime
Crimesakal

मुंबई - मालाड पूर्व परिसरातील नवजाला पाडा येथील नाल्यात नवजात लहान मुलगी जखमी अवस्थेत सापडल्याची घटना नोंदवण्यात आली आहे. या चिमुरडीला महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मुलीच्या अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मालाड पूर्व येथील जीतेंद्र क्रॉस रोडवरील यादव तबेल्याच्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये रविवारी लहान मुलगी असल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. या चिमुरडीला नाल्यातून काढून जवळील महापालिकेच्या म. वा. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत.

पिडीत मुलीला पालकत्त्व नाकारण्याच्या उद्धेशाने तिला नाल्यास फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्राथमिक तपासणीतनंतर या प्रकरणी मुलीच्या अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com