esakal | मुंबई: डिपॉझिटच्या पैशातून शाळा चालवत रफिक यांनी ६६० विद्यार्थ्यांना दिली फी माफी
sakal

बोलून बातमी शोधा

रफिक सिद्दीकी

मुंबई: डिपॉझिटच्या पैशातून शाळा चालवत रफिक यांनी ६६० विद्यार्थ्यांना दिली फी माफी

sakal_logo
By
निसार अली : सकाळ वृत्तसेवा

मालाड: सध्या शाळांच्या फी (school fee) च्या विषयावरुन पालक आणि शाळा चालकांमध्ये वाद झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. या परिस्थितीत मुंबईतील मालवणीमधल्या (Malvani) होली मदर (holy mother english school) या इंग्लिश शाळेने वर्ष 2020 /2021 संपूर्ण शैक्षणिक वर्षाची (education year) फी माफ करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. होली मदर इंग्लिश शाळेचे संस्थापक रफिक सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. (Malad malvani holy mother english school fee waver to more than six hunderad student by rafiq siddiqui dmp82)

शाळेत शिकणाऱ्या 660 विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2020/2021 ची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे फी साठी शाळा प्रशासन आणि पालक यांच्यात संघर्ष सुरू असताना, मालवणी परिसरातील एक लहान शाळेने मोठा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. 2005 साली सुरू झालेली ही शाळा आता दहावी पर्यंत शिक्षण देते.

हेही वाचा: पॉर्न फिल्म रॅकेट: राज कुंद्राने बनवला H accounts नावाचा WhatsApp ग्रुप; वाचा सविस्तर

मालवणी जुना कलेक्टर कंपाऊंड सारख्या वस्तीत असलेल्या या शाळेने नेहमी सामाजिक भान राखत समाज आणि शिक्षण क्षेत्रातील आपली जबाबदारी पार पडली आहे. 26 पैकी 18 शिक्षक व कर्मचाऱ्यांना लॉक डाउन सुरू झाल्यापासून सतत दर महिना रेशन व 50 टक्के पगार दिले जात आहेत.

हेही वाचा: राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरण: आणखी दोन मॉडेल पोलिसांच्या रडारवर

शाळेने खर्च भागवण्यासाठी 5 लाख डिपॉझिट घेऊन शाळेची विज्ञान लॅबची जागा भाड्यावर देऊन त्या पैशाने शाळेचे वीज बिल, शिक्षकांचा पगार, व इतर खर्च भागवला. शैक्षणिक वर्ष 2021/2022 मध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने फक्त 50टक्के फी आकारली जात आहे. या शाळेच्यावतीने 150 टन अन्न धान्याचे वाटप लॉक डाउन सुरू झाल्यापासून वस्तीतील नागरिकांना तसेच गरजू पालकांना केले आहे.

35 विद्यार्थ्यांची फी काही व्यक्ती व संस्था भरत असल्याने त्या 35 विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रफिक सिद्दीकी हे स्वत: दिव्यांग असून त्यांनी या कठीण काळात ही शाळा सुरू ठेवण्यासाठी त्यांनी 5 लाख डिपॉझिट घेऊन विज्ञान लॅबची खोली भाड्याने देऊन त्या 5 लाखामध्ये शाळेचे खर्च चालवले जातायत.

loading image