Malad train murder
esakal
शनिवारी मालाड रेल्वे स्थानकावर प्रोफेसर आलोक सिंग यांची हत्या करण्यात आली होती. ओंकार नावाच्या २७ वर्षीय तरुणाने ट्रेनमध्ये झालेल्या वादातून आलोक यांचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी ओंकारला अटकही केली असून त्याने हत्येची कबुली देखील दिली आहे. पण धावत्या ट्रेनमध्ये नेमकं काय घडलं होतं? ओंकारला एवढा राग का अनावर झाला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच माजी आमदार कपिल पाटील यांनी यासंदर्भात केलेली फेसबूक पोस्टही चर्चेत आहे.