माळशेज घाटात दरड कोसळली, एक जखमी

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सरळगांव - कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील  माळसेज घाटात दरड कोसळल्याने एक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहीती मुरबाडचे नायब तहसीलदार हनुमंता जगताप यांनी दिली. वाहतुकीसाठी हा घाट बंद करण्यात आला असून वाहातूक सुरळीत होण्यास दोन दिवस लागतील असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.    

माळशेज घाटात सतत पडणा-या पावसामुळे मध्य रात्री 2.30 वाजता घाटातून जात असलेल्या माल वाहातूक करणा-या ट्रकवर दरड कोसळल्याने या गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्या उपचारा साठी तातडीने आंळेफाटा येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेची खबर मिळताच मुरबाड नायब तहसीलदार   हनुमंता जगताप हे तातडीने घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली.घाटात पडत असलेला पाऊस, धुके मोठ्या प्रमाणात असल्याने दरट काढण्याचे काम संतगतीने होऊ शकत असल्याने घाटातील वाहातूक सूरू होण्यास किती वेळ लागेल याचा आत्ताच अंदाज जागणे चुकीचे ठरेल असे त्यांनी सांगितले. पोलीस कर्मचारीही टोकावडे पोलीस ठाण्याचे पो. निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत. 

सातत्याने दरडी कोसळत असल्याने हा माळशेज घाट धोक्याचा घाट बनू पहात आहे. पावसाळा सूरू झाल्या पासून जवळ जवळ आठ वेळा घाटात दरड कोसळण्याचे पकार घडले आहेत. 15 दिवसांपूर्वी माळशेज घाटात दरड कोसळून जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा घाट कोसळून दोन जण जखमी झाले आहेत.  नंदकिशोर मलबारी

Web Title: Malashej Ghat, the rift crashed, one injured