मलबार हिल होणार अधिक भक्कम, रस्ता दुरुस्ती आणि टेकडी संवर्धनासाठी 50 कोटी खर्चणार

समीर सुर्वे
Monday, 21 December 2020

मलबार हिल टेकडीची मजबुती आणि रस्त्याच्या बांधकामासाठी महानगर पालिकेने आठ तज्ज्ञांची नियुक्ती केली हाेती.

मुंबई, ता.21 : ऑगस्ट महिन्यात खचलेली मलबार हिल टेकडी पुर्ववत करण्या बरोबरच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी महानगर पालिका 50 कोटी रुपये खर्च करणार आहे. ही टेकडी ‘नेल टेक्नॉलॉजी’म्हणजे उतारावरील मातीत स्टिलचे  रॉड लावून उतारवर धातुची जाळी लावण्यात येणार आहे. पावसाळा वगळता सहा महिन्यात हे काम पूर्ण होणार. 

महत्त्वाची बातमी मुंबईत कंडोमचा वापर झाला दुप्पट; गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर वाढला

ऑगस्ट 5 ला झालेल्या धुवाधार पावसात मलबाह हिल टेकडीचा मोठा भाग खचला होता. हॅंगिग गार्डनलगत असलेल्या न. स. पाटकर मार्गा पासून ही टेकडी खचल्याने माती,झाडांचा ढिगारा थेट बी. जे. खेर मार्गावर आला होता. तसेच, पायध्याला असलेल्या पारसी वसाहतीतील काही इमारतींचेही नुकसान झाले होते. ही टेकडी पुर्ववत करण्यासाठी महानगर पालिकेने मुंबई आयआयटीचे प्राध्यापक डी. एन. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली होती. या समितीने या टेकडीचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करुन नेल टेक्नॉलॉजी पध्दतीने ही टेकडी मजबूत करण्याची शिफारस केली. त्याचबरोबर बी.जे. खेर मार्ग आणि एन.,एस.  पाटकर मार्गच्या दुरुस्तीसाठीही पालिकेला उपाय सुचवला आहे. त्यानुसार महानगर पालिका टेकडी मजबूत करण्याबरोबर रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. प्रत्यक्ष काम आणि सल्लगार शुल्कासह महापालिका या कामासाठी 50 कोटी 49 लाख रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव बुधवारी (ता.23) स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत हवा प्रदूषण, मॉर्निंग वॉक तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक

सल्ल्यासाठी 1 कोटी 20 लाख

मलबार हिल टेकडीची मजबुती आणि रस्त्याच्या बांधकामासाठी महानगर पालिकेने आठ तज्ज्ञांची नियुक्ती केली हाेती. यातील चार सदस्य हे पालिकेबाहेरील असल्याने त्यांच्या शुल्कापोटी 45 लाख 50 हजार रुपये खर्च करणार आहे. त्याचबरोबर पालिकेने या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून स्ट्रक्टव्हेल डिजायनर्स ॲन्ड कंसल्टंट या कंपनीची नियुक्ती केली होती. या सल्लागाराला 81 लाख 6 हजाराचे शुल्क दिले जाणार आहे.

पाच वर्षांची हमी 

मलबार हिल टेकडी पुर्ववत करुन मजबुत करण्यात येणार आहे. या मजबुतीची पाच वर्षांची हमी काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून घेण्यात येईल. कॉक्रिटची संरक्षक भिंत, उतार स्थिरीकरण, माती नेलिंग अशा कामासाठी पाच वर्षांची हमी राहाणार आहे. यात संबंधीत कंत्राटदाराला पाच वर्ष देखभाल करणे तसेच काही दोष असल्यास दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची राहाणार आहे.

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा। Latest News From Mumbai

तज्ज्ञांच्या समितीने काय केले

लिडर सर्वेक्षण यात कॅमेऱ्यातून सर्वेक्षण करण्यात आले. त्याचबरोबर ड्राेन सर्वेक्षण, जीओ टॅक्नीकल तपासणी करण्यात आली. त्यानंतर सॉईल नेलिंग करणे, पुर्वीच्या दगडी संरक्षक भिंतीच्या जागी कॉक्रिटीची भिंती उभारणे, केपम्स कॉर्नर पुलावरील भार कमी करून डांबरीकरण करणे एन.एस पाटकर, बी.जे खेर मार्गाची दुरुस्ती करणे असं सुचवण्यात आलं.

( संपादन - सुमित बागुल )

malbar hills in mumbai to become more stronger BMC to spent 50 crore


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malbar hills in mumbai to become more stronger BMC to spent 50 crore