मालेगाव खटला आणखी किती दिवस चालणार? उच्च न्यायालयाची विचारणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्याचे कामकाज आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केली.

मुंबई - मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोट खटल्याचे कामकाज आणखी किती दिवस चालणार, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) केली.  

मालेगाव स्फोटातील आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केल्या आहेत. त्यापैकी आरोपी समीर कुलकर्णी याच्या याचिकेवर आज न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या खटल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी कुलकर्णी याने केली. खटल्याचे कामकाज धीम्या गतीने सुरू असल्याचा आरोपही त्याने केला. ‘एनआयए’ने हा आरोप फेटाळला. आतापर्यंत ४७५ पैकी १२४ साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली आहे, असे ‘एनआयए’ने सांगितले. या याचिकेवर पुढील सुनावणी दोन ऑगस्टला होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon Bomb Blast Case High Court NIA