पनवेल परिसरातील मॉल पुन्हा सुरू होणार, मात्र 'या' अटींचे पालन आवश्यक

वसंत जाधव
Friday, 4 September 2020

अनेक महिने मॉल बंद असल्याने सर्वांचे नुकसान होत होते. आता मॉल सुरू झाल्याने आनंद होत असून ग्राहकांची आम्ही अधिक काळजी घेऊ, असे या वेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

नवीन पनवेल : मिशन बिगेन अगेन अंतर्गत महापालिकेने पनवेलमधील मॉलला परवानगी दिली आहे. मॉलला परवानगी मिळताच व्यापारी वर्गामध्ये समाधान आणि ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचाः मुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष

कोरोना पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील मॉल लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बंद होते. मिशन बिगेन अगेन अंतर्गत पनवेल महापालिकेने काही नियम व अटी लागू करून मॉल सुरू करण्यास परवानगी दिली. यामध्ये येणाऱ्या ग्राहकांची थर्मल स्क्रिनिंग, मास्क व आरोग्य सेतू ऍप दाखवल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. या वेळी पनवेलमधील ओरियन मॉलही सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी कोरोना योद्धा डॉ. गिरीश गुणे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्या हस्ते मॉलचे रि-ओपनिंग करण्यात आले. मॉल सुरू झाल्यामुळे ग्राहकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाची बातमी : विक्रमगड-पाली मार्गावर एसटी अन् कंटेनरमध्ये भीषण अपघात, 11 जण जखमी

अनेक महिने मॉल बंद असल्याने सर्वांचे नुकसान होत होते. आता मॉल सुरू झाल्याने आनंद होत असून ग्राहकांची आम्ही अधिक काळजी घेऊ, असे या वेळी व्यापाऱ्यांनी सांगितले.

सरकारने आखून दिलेल्या नियम व अटींसह शॉपिंग सेंटर असोशिएशन ऑफ इंडिया या आमच्या संघटनेनी ही नियमावली तयार केली आहे. त्या अनुषंगाने ग्राहकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत आम्ही मॉलचे व्यवस्थापन करणार आहोत. 
- मनन पुरूळेकर, 
बिझनेस डेव्हलपर ओरियन मॉल, पनवेल

(संपादन : उमा शिंदे)

mall in Panvel area reopened with term read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mall in Panvel area reopened with term read full story