खासगी वाहनाने परवानगी घेऊन प्रवास करताय? जरा थांबा! आणि ही बातमी वाचा

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 22 May 2020

अनेक जण खास परवानगी घेऊन बाहेर पडले आहेत. प्रवासाला निघाले आहेत, पण त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. महामार्गावरील मॉल तसेच हॉटेल बंद असल्याने स्वच्छतागृहाचा प्रश्न या वाहन चालकांना सतावत आहे. 

मुंबई : अनेक जण खास परवानगी घेऊन बाहेर पडले आहेत. प्रवासाला निघाले आहेत, पण त्यांचा प्रवास सुखकर होत नाही. महामार्गावरील मॉल तसेच हॉटेल बंद असल्याने स्वच्छतागृहाचा प्रश्न या वाहन चालकांना सतावत आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करुन प्रामुख्याने भोजनाचा अथवा स्वच्छतागृहाचा प्रश्न येत नाही, पण लॉकडाऊनमुळे चांगली स्वच्छतागृह दुर्मिळ झाली आहेत. त्यातच खाद्यपदार्थ तसेच पाण्याचा प्रश्नही येत आहे. मुंबईहून बडोद्यास जाणाऱ्या कुटुंबास सात तासाच्या प्रवासात एकदाच स्वच्छतागृह दिसले. दोन महिने मुंबईत अडकणे भाग पडलेल्या जोशी कुटुंबियांनी अखेर बडोद्यास प्रयाण केले.

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

कडाऊनमुळे रस्त्यावर खूपच कमी वाहने होती त्यामुळे प्रवास वेगाने झाला. पण या संपूर्ण मार्गावर एकही रेस्टॉरंट खुले नव्हते. संपूर्ण मार्गावर एकच स्वच्छतागृह होते. ते पोलिस चेक पोस्टजवळ होते. मुंबईतून निघाल्यानंतर चार तासांनी ते दिसले होते, असे मुंबईहून  सुरतला गेलेल्या शहा कुटुंबियांनी सांगितले. 

मुंबईतून किंवा महाराष्ट्रातून गुजरातला जाता येत आहे. गुजरातने महाराष्ट्रातील लोकांसाठी सीमा खुल्या ठेवल्या आहेत, पण कर्नाटकने आपल्या सीमा बंद ठेवल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना प्रवेश न देण्याचे ठरवले आहे. मुंबईतील संजय मेहता यांची दोन मुले बंगळूरला शिकतात. दोन महिन्यांपासून ते तिथेच फसले आहेत. त्यामुळे मुलांना परत मुंबईत आणण्यासाठी मेहता बंगळूरला गेले होते.

जवळपास पाचशे किलोमीटरचा प्रवास केल्यावर आम्हाला एक चांगले स्वच्छतागृह दिसले. महामार्गावर कोणतेही हॉटेल, रेस्टॉरंट खुले नाही, त्यामुळे त्यांनी पेट्रोल पंप परिसरातच विश्रांती घेतली होती. आता मेहता, शहा किंवा जोशी यांचे अनुभव प्रातिनिधीकच आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्यांसाठी तसेच प्रवास करणे अत्यावश्यक असलेल्यांसाठी एकंदर साडेतीन लाख पास देण्यात आले आहेत. 

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

स्थलांतरीत रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी भोजन, पाणी याच्याबरोबर स्वच्छतागृहांचीही सुविधा पुरवली, पण आता महामार्गावरुन जाणाऱ्या स्थलांतरीत घट झाल्याने या सुविधा बंद केल्या आहेत. मात्र आता प्रवास करायचा असेल तर स्वच्छतागृहांचा प्रश्न कसा सोडवणार याचे उत्तर सध्या कोणाकडेच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As malls and hotels on the highway are closed, the issue of toilets is bothering these drivers.