पालिका शाळांमधील कमजोर मुलांमध्ये 84 टक्‍क्‍यांनी घट 

Malnutrition
Malnutrition

मुंबई : पालिका शाळांमधील कुपोषित मुलांबाबत प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पालिकेच्या गोंधळजनक माहितीबाबत ताशेरे ओढण्यात आले आहे. कुपोषित हा शब्द बदलून आता कमी वजनाचे असा शब्द वापरत वर्षभरात कमी वजनाच्या मुलांमध्ये 84 टक्‍क्‍यांनी कशी काय घट झाली, असा संतप्त सवाल प्रजा फाऊंडेशनच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. पालिका माहिती लपवत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

फोर्ट येथील प्रेस क्‍लब येथे प्रजा फाऊंडेशनकडून पालिका शाळा व अंगणवाडीतील शाळकरी मुलांच्या आरोग्याबाबतचा यंदाचा अहवाल प्रसिद्ध केला. माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीच्या आधारांतून पालिका संपूर्ण माहिती देत नसल्याचे आरोप प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी केला. 2016-17 पासून पालिकेने कुपोषित या शब्दाऐवजी कमी वजनाचे असा उल्लेख बंधनकारक केला. याच वर्षापासून पालिका शाळांमधील मुलांच्या आरोग्याबाबत पालिका माहिती देण्यास लपवाछपवी करत असल्याचा आरोप प्रजा फाऊंडेशनने केला आहे. 2016-17 साली पालिका शाळांमध्ये कमी वजनाची 73 हजार 112 विद्यार्थी होते. 2017-18 साली त्यात 84 टक्‍क्‍यांनी घट होत हा आकडा 11 हजार 720 वर खाली सरकला. मुलांच्या स्थितीत सुधारणा होण्यामागे कोणते कारण आहे, याबाबत माहिती अधिकारात कोणतीच माहिती दिली गेली नाही. 

2015-16 साली कुपोषित संज्ञा रुढ असताना पालिका शाळांमध्ये 64 हजार 681 विद्यार्थी कुपोषित आढळले. कुपोषित संज्ञा बदलताच 2016-17 साली एकही विद्यार्थी पालिका शाळांमध्ये कुपोषित आढळला नाही, याबाबतही प्रजा फाऊंडेशनच्यावतीने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मागील पाच वर्षांपासून अल्पवजनची टक्केवारी 18 टक्‍क्‍यांवर स्थिर आहे. त्यामुळे पालिकेच्या माहिती संशयास्पद असल्याचा आरोपही प्रजा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आला. याबाबत पालिका आरोग्य अधिकारी डॉ पद्मजा केसकर यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही. 

पालिका शाळांमध्ये कमी वजनाच्या मुलांचा आकडा नाट्यमयरित्या घसरल्याने पालिका आयुक्‍तांनी 2018-19 शैक्षणिक वर्षापासून पालिका शाळांमध्ये पोषक आहारासाठी 27.38 कोटी रुपयांचे अतिरिक्त वाटक कशासाठी केले. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. 
- मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com