
Mama Pagare controversial statements against BJP
ESakal
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वादग्रस्त प्रतिमा समाज माध्यमातून व्हायरल केल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना साडी नेसवत सत्कार केला होता. तर ज्येष्ठ व्यक्तीला अशी वागणूक दिल्याने याविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी काँग्रेस मागणी करत आहे. शनिवारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ कल्याण मध्ये आले. त्यांनी मामा यांना खांद्यावर घेतले, त्यांचा सत्कार केला. दरम्यान भाषणात मामा यांनी पुन्हा संघाच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप पदााधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस मध्ये पेटला आहे.