esakal | मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

mantralaya

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून ४४ वर्षीय व्यक्तीने मंत्रालयासमोर मादाम कामा रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (marine drive police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, सात जिल्ह्यांना अलर्ट

प्रकाश शंकर पाटील, असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मंत्रालयासमोर डिझेल घेऊन पोहोचले. त्यांनी डिझेल अंगावर ओतून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला रोखले. साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी ४ महिन्यांपूर्वीच संपलेली आहे. मात्र, अद्यापही सदनिकांबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे ४६ सदनिका धारकांना न्याय मिळत नसल्याने या व्यक्तीने टोकाचे पाऊस उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकाश पाटील या व्यक्तीला २० हजाराच्या जामीनावर मुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यात २ व्यक्तींनी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. १५ ऑगस्टला मुख्यमंत्री मंत्रालयातील ध्वजारोहण करून बाहेर पडल्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुनील गुजर असे या शेतकऱ्याचे नाव होते. तसेच २० ऑगस्टला गावातील घर आणि जमीन बळकाविल्याच्या वादातून पुण्यातील आंबेगाव येथील व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

loading image
go to top