

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : लोकलच्या छतावर चढण्याचे धोकादायक प्रकार थांबण्याचे नाव घेत नसून, घाटकोपरमधील घटनेनंतर गुरुवारी कांजूरमार्ग स्थानकातही असाच प्रकार घडला. सीएसएमटी-डोंबिवली लोकलच्या छतावर एक तरुण चढल्याचे निदर्शनास येताच रेल्वे प्रशासनाने खबरदारी म्हणून ओव्हरहेड वायरचा (ओएचई) वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे लोकल कांजूरमार्ग स्थानकात थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तरुणाला छतावरून सुरक्षितपणे खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.