

भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आपल्याला रेबिज झाल्याच्या भीतीने ३० वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. कल्याणमध्ये तरुणाच्या आत्महत्येनं खळभळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आयश विश्वनाथ अमीन याला भटक्या कुत्र्यानं चावा घेतला होता. पायाला चावा घेतल्यानं त्याला जखम झाली होती. त्यानं रेबिजच्या लसीचं इंजेक्शनही घेतलं होतं.