पत्नीच्या स्टेटसवर अश्लील कमेंटचा जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या; लग्नाच्या वाढदिवशीच संसार उद्ध्वस्त

Nalasopara व्हॉटसअप स्टेटसच्या वादातून हत्या झाल्याच्या घटनेनं नालासोपाऱ्यात खळबळ उडाली आहे. पत्नीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या स्टेटसवरून वाद झाला होता. शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
Social Media Dispute Leads To Murder In Nalasopara

Social Media Dispute Leads To Murder In Nalasopara

Esakal

Updated on

नालासोपाऱ्यात पत्नीच्या व्हॉटसअप स्टेटसला अश्लील कमेंट करणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं नालासोपारा पश्चिम इथल्या हनुमान नगरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. आफताब शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com