esakal | सुन्न करणारं वास्तव ! कंपनीनं केली पगार कपात म्हणून त्यानं स्वतःला.... 
sakal

बोलून बातमी शोधा

सुन्न करणारं वास्तव ! कंपनीनं केली पगार कपात म्हणून त्यानं स्वतःला.... 

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग चहूबाजूंनी संकटात सापडलं आहे. जगातले सर्व देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत.

सुन्न करणारं वास्तव ! कंपनीनं केली पगार कपात म्हणून त्यानं स्वतःला.... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग चहूबाजूंनी संकटात सापडलं आहे. जगातले सर्व देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं त्याच्या वेतनात कपात केल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

२ मे पासून रुग्णालयांना लागू होणार 'हे' नवीन नियम, सरकारने घेतलेत 'मोठे' निर्णय...

मनीष लोदया असं या ४२ वर्षांच्या व्यक्तीचं नाव आहे. कंपनीनं त्यांच्या वेतनात कपात केली म्हणून त्यांनी आपल्या राहत्या सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. उडी मारल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.

मनीष हे एका मोठ्या कंपनीत फायनान्स विभागात कामाला होते. काही वर्षांपूर्वीच ते कॅनडाहून मुंबईत आले होते. त्यानंतर ते आपली पत्नी,दोन मुलं आणि आईसोबत मुलूंडमध्ये राहत होते. मनीष यांच्याकडे बघून ते कुठल्याही तणावात असतील असं जाणवत नव्हतं. तसंच ते आणि त्यांचं कुटुंब सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असं त्यांच्या शेजऱ्याचं म्हणणं आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकलो नाही अशी खंत त्यांच्या काही शेजाऱ्यांनी आणि आप्तस्वकीयांनी व्यक्त केली आहे.      

"तर मला द्यावा लागेल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा".; उद्धव ठाकरेंनी केला पंतप्रधानांना फोन...

लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करावी लागत आहे. मात्र यामुळे या कर्मचाऱ्यांवर मानसिक तणाव येत आहे.

man from mumbai took extreme step after salary cut due to corona virus lockdown  

loading image
go to top