आयडियाची कल्पना! लॉकडाऊनमध्येही त्याने केला मुंबई ते अलाहाबाद प्रवास

onion truck
onion truck

मुंबई ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण वेगवगेळ्या शहरांत अडकून पडले आहे. त्यांनी घरी परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे अनेकांना परतीचा मार्ग पत्करावा लागला. मात्र, एका पठ्ठ्याने अशी काही कल्पना लढवली की त्याने मुंबईहून अलाहाबादला सहजपणे गेला. हा प्रवास करण्यासाठी त्याने लढवलेली शक्कल वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

प्रेम मूर्ती पांडे हा युवक मुंबई विमानतळावर काम करतो. त्याचे गाव अलाहाबाद शेजारी आहे. लॉकडाऊनचा पहिला टप्पा त्याने कसाबसा सहन केला, पण त्यानंतर त्याला आपल्या गावापासून दूर राहणे जास्तच अवघड झाले. तो म्हणाला की, मी अंधेरी पूर्व येथील आझाद नगरात राहतो. मी राहतो त्या भागात त्या भागात खूपच दाटवस्ती आहे. त्यामुळे त्या भागात कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळेच मी गावाला जाण्याचे ठरवले. पांडेने ठरवले खरे, पण जाणार कसे हा प्रश्न होता. बस आणि रेल्वेची वाहतूक पूर्ण बंद आहे. विमानांचे ऊड्डाणही थांबले आहे. 
पांडेने विचार करायला सुरुवात केली. त्यावेळी जीवनावश्यक वस्तूची वाहतूक सुरु आहे हे त्याच्या लक्षात आले. सरकारने फळे तसेच भाजीपाल्याच्या वाहतूकीस परवानगी दिली आहे. त्याने नाशिकजवळच्या पिंपळगाव येथील एक मिनी ट्रक आरक्षित केला. तेथून त्याने दहा हजाराची कलिंगड मागितली. त्याने ही कलिंगडे येण्यापूर्वीच त्याबाबत मुंबईतील एका व्यापाराबरोबर करार केला होता. 

पिंपळगाव मार्केटचा अभ्यास सुरु असताना तिथे कांद्याची विक्रीही होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने 24 हजार 420 किलो कांदे घेतले ते 9 रुपये 10 पैसे प्रतिकिलो दराने. त्यासाठी त्याने 2 लाख 32 हजार रुपये मोजले. आता त्याने अलाहाबादला कांदे नेण्यासाठी ट्रक आरक्षित केला. त्यासाठी त्याने 77 हजार 500 रुपये मोजले. पांडेचा 20 एप्रिलला अलाहाबादसाठीचा प्रवास सुरु झाला. तो 23 एप्रिलला तिथे पोहोचला. मुंदेरा होलसेल मार्केटमध्ये त्याने कांदे विकण्याचा प्रयत्न केला, पण ते घेण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसले. आता त्याने ट्रक थेट त्याच्या गावी म्हणजेच कोतवा मुबारकपूर येथे नेला. त्याने तिथे कांदे ट्रकमधून खाली उतरवले. 

पांडे याच्या या प्रवासाची कल्पना तोपर्यंत स्थानिक पोलिसांना आली होती. पांडे धूमनगंज पोलिस स्टेशनला गेला. त्याची वैद्यकीय तपासणी झाली. त्याला चौदा दिवस विलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली. अर्थात विकत घेतलेले कांदे अजूनही पांडेकडे आहेत. सध्या परिसरातील मार्केटमध्ये मध्य प्रदेशातील सागर येथून आलेल्या कांदे भरपूर आहेत, पण एकदा ते विकले गेल्यावर आपण नाशिकला घेतलेल्या कांद्यांना नक्कीच विक्रेते लाभतील याची पांडेला खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com